कलयुगातल्या नरकासुराचा वध करायला उमाताई तू काली का झाली नाहीस?
कलयुगातल्या नरकासुराचा वध करायला उमाताई तू काली का झाली नाहीस? डॉ. अलोक पवार स्थळ... नगर जिल्ह्यातील चिंचोडी हे गाव. गावासारखे गाव असल्याने छोटेसे गाव म्हणायला हरकत नाही. दिवाळीची सुट्टी लागणार होती. अंगणवाडी मधून लहान बालकांचे पोषण व्हावे म्हणून त्यांना सरकार तर्फे सुका शिधा देण्यात येतो. या शिधा वितरणाचे काम पूर्णपणे अंगणवाडी सेविका करतात. अंगणवाडी मध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिधा दिला जातोय का, याकडे चोख पणे लक्ष देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात. दिवाळीची सुट्टी सुरु होणार असल्याने हे काम त्वरित उरकायचे होते. कोणताही विद्यार्थी शिधेपासून वंचित राहणार नाही याची जवाबदारी होती म्हणावयास हरकत नाही. अंगणवाडी सेविका उमा पवार यांनी एका पालकांना फोन लावला की तुमच्या मुलीच्या नावाचा शिधा घेऊन जा, तिला या फोन मुळे पुढे येणारे संकटमयी भविष्य याची जरादेखील चाहूल नव्हती. उमा पवार हिला तीन व सहा वर्षांची मुले आहेत. आपल्या मुलांचे आणि एकूणच परिवाराला हात लागावा म्हणून तिने ही अंगणवाडी सेविकेची नोकरी स्वीकारली होती. साधारण शिक्षिका हा नोकरी ही सुरक्षित अशी समजली जाते. म्हणज...