Posts

Showing posts from January, 2022

१ जाने १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण?

Image
 १ जानेवारी १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण? अलोक पवार १ जानेवारी, नवीन वर्ष साजरे करताना काही ठराविक भागात फ्लेक्स बघितले ज्यावर शौर्य दिवस असे लिहिले होते. म्हणजे असे काय नक्की घडले होते, ज्याला मी एकदमच अनभिज्ञ होतो. तेंव्हा माहिती कळली की १ जानेवारी १८१८ मध्ये ब्रिटिश आणि पेशवा यांच्यामध्ये युद्ध झाले आणि हे युद्ध ब्रिटिशांनी जिंकले. पेशव्यांच्या सैन्यामध्ये बरेच मराठा सैनिक होते. ते हरले, त्यांनी माघार घेतली, पेशव्यांच्या इतिहासातील हे युद्ध अपमानास्पद होतेच पण दुर्दैवाने हे युद्ध त्यांचे शेवटचे युद्ध ठरले. पेशवे हरले, मराठा हरले, आणि ब्रिटिश जिंकले. तरीही ब्रिटिशांच्या जिंकण्याचा आपण शौर्य दिवस इकडे भारतात पुण्यात करतोय? हो आणि कारण तसेच आहे, कारण हे युद्ध आपल्या समोर नक्की कोणामध्ये झाले आहे हे चुकीच्या पद्धतीने मांडल गेलंय आपल्यासमोर हे युद्ध ब्रिटिश व मराठा यांच्यात झाले आहे असे मांडले गेले आहे. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये कदाचित चिडचिड होणे साहजिक असू शकते, पण आपण नक्की इतिहास होता काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.   ब्रिटिश भारतात आले, मसाल्याची कंपनी ईस्...