कलयुगातल्या नरकासुराचा वध करायला उमाताई तू काली का झाली नाहीस?
कलयुगातल्या नरकासुराचा वध करायला उमाताई तू काली का झाली नाहीस?
डॉ. अलोक पवार
स्थळ... नगर जिल्ह्यातील चिंचोडी हे गाव. गावासारखे गाव असल्याने छोटेसे गाव म्हणायला हरकत नाही. दिवाळीची सुट्टी लागणार होती. अंगणवाडी मधून लहान बालकांचे पोषण व्हावे म्हणून त्यांना सरकार तर्फे सुका शिधा देण्यात येतो. या शिधा वितरणाचे काम पूर्णपणे अंगणवाडी सेविका करतात. अंगणवाडी मध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिधा दिला जातोय का, याकडे चोख पणे लक्ष देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात. दिवाळीची सुट्टी सुरु होणार असल्याने हे काम त्वरित उरकायचे होते. कोणताही विद्यार्थी शिधेपासून वंचित राहणार नाही याची जवाबदारी होती म्हणावयास हरकत नाही. अंगणवाडी सेविका उमा पवार यांनी एका पालकांना फोन लावला की तुमच्या मुलीच्या नावाचा शिधा घेऊन जा, तिला या फोन मुळे पुढे येणारे संकटमयी भविष्य याची जरादेखील चाहूल नव्हती. उमा पवार हिला तीन व सहा वर्षांची मुले आहेत. आपल्या मुलांचे आणि एकूणच परिवाराला हात लागावा म्हणून तिने ही अंगणवाडी सेविकेची नोकरी स्वीकारली होती. साधारण शिक्षिका हा नोकरी ही सुरक्षित अशी समजली जाते. म्हणजे लहान मुलांना वेळेत दिवसाच्या वेळेला शिकवा आणि घरी या एकदम सुरक्षित. मात्र महाराष्ट्रातल्या बदलापूरच्या घटनेने शाळेमधील सुरक्षित वातावरणाला काळिमा फासला. त्याला काही दिवस जात नाहीत तोवर चिचुंडी च्या अंगणवाडी मध्ये दुसरी घटना घडणार होती.
मुलीचे पालक शिधा घेण्यासाठी अंगणवाडी मध्ये आला. त्याला पालक काय म्हणायचे नराधमाने अंगणवाडी मध्ये प्रवेश केला. लहान मुलांच्या मातीच्या घड्याला जिथे घडवले जाते जिथे मनापासून आपले चोख काम पार पाडणारी शिक्षिका काम करते आहे तिच्यावर या नराधमाने आपली कुनजर टाकली तिच्यावर ब ला त्कार करून तिला विहिरीत टाकून दिले.
ही घटना रात्रीची अपरात्रीची घडलेली नसून दिवसाढवळ्या घडलेली घटना. विहिरीत आपटली गेल्याने, नाकातोंडात पाणी गेल्याने, व सुरवातीला झालेल्या अत्याचाराने उमा ताई गेल्या. या नराधमाने क्षणिक मज्जा करण्यासाठी ताईचा जीव घालवला. तिच्या आयुष्याला बत्तीसाव्या वर्षी पूर्णविराम लागला.
नराधमाला शिक्षा होईल. त्याला फाशी देखील होईल. प्रश्न असा येतो जर अंगणवाडी सेविका म्हणजे शिक्षणाचे दार इथे सुरक्षित नाही तर मुख्यालयाचे काय? तिच्या दोन लहानग्यांचे काय? त्यांना जीव लावणारी माऊली पुन्हा अवतारणार का? त्याच्यावर तू जशी आई आणि अंगणवाडीतील पाहिली शिक्षिका म्हणून संस्कार लावत होतीस तसे कोण करणार. ताई तुझे नाव 'उमा' होते तू त्या नराधमासाठी 'काली' का झाली नाहीस गं? का तुझे प्रयत्न त्या नराधमापुढे अपुरे पडले.
तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचे पडसाद पुढे काय झाले माहिती. संपूर्ण गाव तुझ्यासाठी एकत्र आले. गावात मोर्चे आणि रात्रीचा कॅण्डल मार्च काढण्यात आला. हे सगळं अगदीच गरजेचे आहे आणि होते. पण त्याच्याही पुढे जाऊन सध्याच्या घडीला एका वृत्तीला विरोध करण्याची गरज आहे. ती प्रवृत्ती घडू नये सावध असावा म्हणून कठोर अंबलबजावणीची गरज आहे.
काही जवाबदारी सरकारी दरबारी पार पडल्या गेल्या पाहिजेत. अंगणवाडी सेविकांना सोबतीला मदतनीस या हव्यातच. किंवा तसे न झाल्यास शालेय शिक्षण समितीने एका स्त्री पालकांची नियुक्ती मदतगार म्हणून करून देण्यात यावी. याची सोय आळीपाळीने असल्यास बऱ्याच स्त्री पालकांना सोईचे जाईल. पोषण आहार वाटपाच्या वेळी किंवा गरजेच्या ठिकाणी हे हवेच.
प्रत्येक मुलीला आपल्याला स्वतःला जपले पाहिजे यासाठी धडे देण्याची आवश्यकता आहे. आणि या नराधमांची शिक्षा ही इतकी जबराट असली पाहिजे की व्यक्ती असे काही मनात आणण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल. या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे. आज दिवाळीचा नरक चतुर्दशी चा दिवस. सत्यभामेने नरकासुराला ठार मारून विजय प्राप्त केला होता. इथे नरकासुर हा तोच आहे. फक्त द्वापारयुगाच्या जागी कलयुग आहे. द्वापारयुगातील त्या नरकासुराने अनेक स्त्रिया आपल्या महालात आपल्या सेवेसाठी बंदी करून ठेवल्या होत्या. या नरकासुराने स्वतःची का म भा वना मिटवण्यासाठी हे दुषकृत्य केले. या नरकासुराला शिक्षा देण्याचे काम हे आपल्या सरकारी यंत्रनांचे आहे. फास्ट ट्रक कोर्टात शिक्षेची सुनावणी होणे गरजेचे आहे. या नराधमाला फाशी होणे गरजेचे आहे. तरच ताईच्या लढ्याला यश येईल.


Comments
Post a Comment