जी२० चे यजमानपद भारताला
जी२० चे यजमान पद भारताला
डॉ. अलोक पवार
जर कोणी एखादा व्यक्ती आर्थिक मंदित अडकला तो डुबतो आहे तर तो स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतो. तो पुरेपूर हातपाय हलवतो. आणि या सर्व गोष्टीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. हे करित असताना तो नानापरीने प्रयत्न करतो आणि पुन्हा कसा बाहेर येईल याच्यासाठीची त्याची धडपड ही वाखारण्या जोगी असते. आता तो व्यक्ती जेंव्हा दुसरीकडे मदतीसाठी हात पसरतो तेंव्हा जर तो म्हणाला बाबा मलाच थोडी मदत कर तर परिस्थिती थोडी नाजूक असते.
बर ही जी परिस्थिती आहे ती एक दोघांची नसून संपूर्ण देशाची आहे असे म्हणले तर आणखीन मरगळ येते. यापुढे हिच परिस्थिती बाजूच्या देशांची आहे असे म्हणालो तर मेल्याहून मेल्यासारखे होईल. हो ही गोष्ट आहे जागतिक मंदीची. संपूर्ण जगातील काही ठराविक देश सोडले तर संपूर्ण जग जेंव्हा जागतिक मंदीच्या झळा सहन करित असते तेंव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. तेंव्हा प्रत्येक देशाने संयमाने त्या गोष्टीवर विचार करून विविध मार्ग काढणे हा उत्तम पर्याय असतो. १९९७ साली परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्यावर खबरदारी म्हणून १९९९ मध्ये परराष्ट्रमंत्री यांच्या मार्गदर्शनाने जी२० ची स्थापना झाली. भारता वर देखील २००८ दरम्यान ही मंदी ची वेळ आली होती. नोकऱ्या रोजगार याची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. जेंव्हा हे संकट ओढवते तेंव्हा हे सर्व देश एकत्र येऊन यावर चर्चा करतात. उपाययोजना करतात, अंमलबजावणी करतात. आणि परिस्थिती कशी बदलू शकते याकडे लक्ष देतात. हे सर्व होत असताना देशातील लोक हे इतर देशांत जाऊन ती परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत सर्व संकल्पनांना उधाण येतो म्हणायला हरकत नाही.
२०२३ मध्ये या जी२० चे यजमान पद भारताला मिळाले आहे. तसे बघायला गेलो तर भारतासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण जी२० राष्ट्रगटात भारताशिवाय अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका अशा 19 देशांचा तर युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे. बरोबरीने संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक अशा आंततराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख तसंच काही देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतात.
ही संकल्पना इतकी सुंदर आहे. यातून या सर्व २० देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी देखील संधी आहे. तर
Comments
Post a Comment