डॉक्टर देव मग हॉस्पिटल बाजारपेठ का?
डॉक्टर देव मग हॉस्पिटल बाजारपेठ का? अलोक पवार अजूनही आपण सर्वजण कोरोनाच्या विळख्यात अडकलो आहे, चीन मधून पसरवल्या गेलेल्या या कोरोनामुळे संपूर्ण जगाने एक वेगळे विश्व पाहिले. बहुतांशी सर्व जण घरीच म्हणजे लॉकडाउन झाले. आणि जे बाहेर पडले ज्यांना बाहेर पडल्याशिवाय अगदी पर्यायच नव्हता असे कोरोना संसर्गाला बळी पडले. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच जणांना घरी बसून अर्ध्या तोडक्या मोडक्या पगारात काम करावे लागले. काही जणांच्या भुकेची मारामार झाली काहींना तर आपल्या आई वडील किंवा नातेवाईकांची चिता बघणे पण नशिबी आले नाही. कोरोना झालेल्या व्यक्तींवर अद्याप काही उपाय भेटला नाही. कोरोनाच्या लसी भेटल्या. भारतामध्ये अमिताभ बच्चन ने लोकांना फोनवरून कळकळीने सांगितले लस घ्या लस घ्या. लोकांनी लस देखील घेतल्या. काहींनी तर 'आता आम्ही अमर झालो', असे स्टेटस देखील ठेवले. या सर्वांमध्ये डॉक्टर आणि नर्स हे अगदीच देवासारखे धावून आले. आपल्या निदानात्मक म्हणजे अगदी कॉम्प्युटर च्या भाषेत ट्राय आणि प्रोसिड म्हणजे तापाच्या, व्हिटॅमिन च्या, अगदी एड्सच्या गोळ्या औषधांचा पण पेशंट वर प्रयोग करून बघायचा झाला ...