Posts

Showing posts from October, 2022

अभिनंदन... मोदींच्या तर्फे देशाला स्वदेशी विमाने

Image
  अभिनंदन ... मोदींच्या तर्फे देशाला स्वदेशी विमाने डॉ. अलोक पवार सगळ्या न्यूज चॅनेल्स वर सध्या बातम्या बघितल्या. अखेर टाटा एअरबस ही विमान बनविणारी कंपनी गुजरातमधील बडोदा या ठिकाणी थाटली जाणार. जाणार म्हणजे अगदी निश्चितपणे कारण भले ही आपल्याला सत्यनारायण पूजेच आमंत्रण नसेल तरीही ३० ऑक्टोबर २०२२ ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटा एअरबस, बडोदा, गुजरात या ठिकाणी कोनशिला पूजन म्हणजेच पायाभरणीचा कार्यक्रम आहे.  आता आपल्याला आमंत्रण नसेल तरी नाराज होऊ नका. कारण कदाचित आपल्याला पुढे जाऊन न्यूज चॅनेल्स किंवा वर्तमानपत्रमध्ये पंतप्रधान यांच्या या कार्यक्रमाचे फोटो नक्कीच बघायला भेटतील. आपले पंतप्रधान फोटो काढण्यासाठी ते जगाच्या काना कोपऱ्यात जाण्यासाठी तत्पर असतात हे आपल्याला नवखे नाही. त्यामुळे काळजी करणाचे कारण नाही. काळजी सोडून आपण हा प्रकल्प नक्की काय आहे हे समजवून घेऊ. भारताची लष्करी सेवा यामध्ये मोठी सुधारणा होत आहे. २०२१ मध्ये आपण स्पेन कडून ५६ सी २९५ एम. डब्लू . ही वाहतूक करणारी विमाने मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस.ए. या कंपनीकडून विकत घेतली. बघा हे किती छा...

बाबासाहेबांमुळे दिवाळी गोड

Image
  बाबासाहेबांमुळे दिवाळी गोड डॉ. अलोक पवार यावेळी दिवाळीचे फटाके म्हणजे मोबाईल वरचे व्हाट्सअपचे मेसेज चे आवाज. व्हाट्सअप वर तर स्टेटस ला भरपूर शुभेच्छांचा वर्षाव होतो. वसुबारस च्या शुभेच्छा, ही लक्ष्मी पावो, ती भाग्य लक्ष्मी प्राप्त होवो असा खूप शुभेच्छा होत्या.  एक मेसेज मात्र असा होता ज्यामध्ये दिवाळी आणि बाबासाहेबांमुळे दिवाळी असा होता. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो एका धर्माचा मोठेपणा सांगण्यासाठी आताच्या काळात दुसऱ्या धर्माला नाव अजिबात ठेवू नका. सध्या आपण असे केले तर फक्त आणि फक्त भांडण होतील. मी तो मेसेज नीट वाचला. कामगार, महिन्यांचा हिशोब आणि बोनस यावर होता.  भारत स्वातंत्र होण्याच्या कारकिर्दीमध्ये बरेच लोक असे होते की ज्यांना घर चालवायचे होते. ते शेती नाही म्हणून शेतावर उपजीविका करू शकले नाहीत. आणि घरचे झाले थोडे म्हणून घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्रवीर देखील बनू शकले नाहीत. त्यांच्या नजरेसमोर प्रपंचाचा महामेरू होता. म्हातारे आई वडील होते. पोरांच्या पोटाची भूक होती. इंग्रजांच्या पदरी पडेल ती नोकरी मिळावी चार पैसे मिळावे हिच माफक अपेक्षा. बरेच जण होते असे. इंग...