Posts

Showing posts from March, 2022

पाणी ... पाणी....

Image
पाणी.... पाणी..... अलोक पवार आता या गोष्टी वाचल्या ना की प्रचंड संताप येतो, मनामध्ये राग येतो, की पाणी... या पाण्याबद्दल पण लोकांचे मत असे होते. मराठीमध्ये या पाण्याला जीवन म्हणले आहे, म्हणजे पाणी नाही तर जीवन नाही. मग पाणी अडविण्यासाठी हा अट्टहास का होता. प्रत्येक गोष्ट अभ्यासताना तो लढा, तो त्रास बघितला ना की मग त्याचे महत्व कळते. अहो त्रास झाल्यावर डोळ्यातून पाणी यायला पण शरीरात पाणी असावे लागते, मग तुम्ही पाणीच अडवता आहात. बर हे युध्द कोणत्या दोन देशातले, दोन राज्यांतले दोन वेगवेगळ्या प्रदेशातले असे नव्हते, हे युद्ध होते दोन व्यक्तींमधले. त्यातला एक व्यक्ती पूर्वीपासून मुका झाला होता, आणि दुसरा व्यक्ती झाला होता सत्ताधारी.  हो तीच ही मनुस्मृतीने पेटवलेली ठिणगी. चार वर्णात विभागलेली व्यवस्था, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र. ही पाण्याची गोष्ट आहे शुद्रांची. त्यांना पाणी नाही. म्हणजे पाणी देवाने दिले असते, आणि ते जर शूद्राने शिवले तर ते नासणार, या सर्व नाहक, संकल्पना त्या काळी पसरवलेल्या. (त्या काही ठिकाणी तर अजून टिकवून ठेवल्या आहेत, तो भाग निराळा). भारतामध्ये ही जी जातीयवाद...