महात्मा फुले आणि मक्तेदारी मोड
महात्मा फुले आणि मक्तेदारी मोड प्रा. अलोक पवार काही वेळेस असे होते की, बऱ्याचदा एखादी वस्तू किंवा सेवा देणारे बाजारात कोणीही नसले तर त्या वस्तूंची मक्तेदारी त्या वस्तूसाठी वाढत जाते. मक्तेदारीलाच इंग्रजी मध्ये मोनोपोली असे म्हणतात. भारतामध्येही अशाच प्रकारची मक्तेदारी काही वेगळ्या क्षेत्रात दिसून येते. हा मक्तेदारीचा प्रकार थोड्याश्या वेगळ्या प्रकारचा दिसून येतो. आधी ज्या प्रकारे सेवा किंवा वस्तू ग्राहकांना दिल्या जायच्या त्या ग्राहकांच्या पसंतीच्या असतीलच असे नाही कारण त्या उत्पादनोभिमुख अशा असायच्या. मात्र कालांतराने त्या ग्राहक केंद्रित झाल्या. त्यातल्याच एका सेवेच आणि त्या सेवेची मक्तेदारी कशी तोडण्यात आली याबद्दलचा माझा हा लेख. आधी आपल्या भारतामध्ये चतुर्श्रेणी वर्णव्यवस्था होती. आणि त्याला अनुसरून सर्व कायदे- कानून अमलात आणले जायचे. त्यामध्ये वरिष्ठ वर्ग हा नेहमी कनिष्ठ वर्गातील लोकांना दुय्यमत्व देऊन नेहमीच समाजात स्थान कसे खालीच राहील याकडे लक्ष देत. बऱ्याच समाजसुधारकांनी याकडे ही परिस्थिती कशी बदलेल या नजरेतून बघितले आहे. त्यामध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपास...