Posts

Showing posts from May, 2023

चुकीची नजर : चुकीची मांडणी

चुकीची नजर : चुकीची मांडणी  डॉ. अलोक पवार  मला माहिती आहे माझे हे लेखन कदाचित बऱ्याच लोकांना न पटणारे असेल किंवा पटवून घेण्याची मानसिकता देखील कुठेतरी लांब ठेवून काही लोक माझ्या मांडणीकडे पाहतील. काही लोक विषय समजल्यावर वाचणे देखील सोडून देतील. कारण मी मुळातच माझ्या, 'युद्ध का गरजेचे आहे' या सदराच्या अंतर्गत या लेखाची मांडणी केलेली आहे. हो नुकताच एक चित्रपट प्रकाशिक झाला ' द केरळा स्टोरी ' आणि त्याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर माझे हे लिखाण आहे. खर तर हा चित्रपट जेंव्हा लेखक, निर्माते यांच्या कडून सत्य घटनेवर आधारित आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा एखादा चित्रपट निर्माता त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करतो आणि त्यावर आधारित तो चित्रपटाची मांडणी करतो आणि त्याची सुरवात मूळ चित्रपटाला काय नाव दिले जाते आहे तेथून देखील सुरवात होते. जेंव्हा चित्रपटाचे नाव आपण पाहतो आणि त्याला अनुसरून आपण चित्रपट पाहतो तेंव्हा चित्रपटाचे नाव आणि चित्रपट यांचा ताळमेळ कोठेही दिसत नाही. चित्रपटाच्या नावातील तीनही शब्द 'द', 'केरळ', 'गोष्ट' हे तीनही शब्द आपण समजावून घेऊ. जें...