Posts

Showing posts from February, 2022

हिजाब...

Image
  हिजाब...  अलोक पवार लेख लिहिताना समोर येणाऱ्या सर्व गोष्टींना सामोरे जायचे हे लक्षात ठेवूनच लेख लिहितोय. खूप टोमणे मारले जातील पण मत तर मांडणे गरजेचे आहे ना. म्हणून सुरवात. कर्नाटक मधील शाळांमधून काही गोष्टींना सुरवात झाली. म्हणजे ज्या मुलींनी हिजाब परिधान केला त्यांची छेडछाड करण्यात आली. मग शाळेने त्यांना हिजाब घालू नये अशी सुनावणी केली. मग त्या मुलींनी तरीही हिजाब घातला. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले की शिक्षण मंदिर म्हणजे शाळा किंवा कॉलेज मध्ये यापुढे हिजाब घालावा की नाही. आणि लागेहाथ हे संपूर्ण प्रकरण संपूर्ण देशात पसरले. याच प्रकरणाला एक नवे वळण देखील मिळाले, ' हिजाब विरुद्ध भगवा'. धर्मिकतेचीही जोड दिली गेली.  म्हणजे मी लहानपणापासून शिकत आलो आहे, की पूर्वीपासून या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाला रोख लावला जातोय. मग महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी पावले उचलली. चिखल, शेण गोळे हेही सावित्रीबाई यांनी अंगावर झेलले. आजच्या स्त्रिया शिकत आहेत. खरं तर आहेत यापुढे मला खरंच प्रश्नचिन्ह लावावेसे वाटते. म्हणजे बघा त्या वेळच्या सावि...