जी२० चे यजमानपद भारताला
जी२० चे यजमान पद भारताला डॉ. अलोक पवार जर कोणी एखादा व्यक्ती आर्थिक मंदित अडकला तो डुबतो आहे तर तो स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतो. तो पुरेपूर हातपाय हलवतो. आणि या सर्व गोष्टीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. हे करित असताना तो नानापरीने प्रयत्न करतो आणि पुन्हा कसा बाहेर येईल याच्यासाठीची त्याची धडपड ही वाखारण्या जोगी असते. आता तो व्यक्ती जेंव्हा दुसरीकडे मदतीसाठी हात पसरतो तेंव्हा जर तो म्हणाला बाबा मलाच थोडी मदत कर तर परिस्थिती थोडी नाजूक असते. बर ही जी परिस्थिती आहे ती एक दोघांची नसून संपूर्ण देशाची आहे असे म्हणले तर आणखीन मरगळ येते. यापुढे हिच परिस्थिती बाजूच्या देशांची आहे असे म्हणालो तर मेल्याहून मेल्यासारखे होईल. हो ही गोष्ट आहे जागतिक मंदीची. संपूर्ण जगातील काही ठराविक देश सोडले तर संपूर्ण जग जेंव्हा जागतिक मंदीच्या झळा सहन करित असते तेंव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. तेंव्हा प्रत्येक देशाने संयमाने त्या गोष्टीवर विचार करून विविध मार्ग काढणे हा उत्तम पर्याय असतो. १९९७ साली परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्यावर खबरदारी म्हणून १९९९ मध्ये परराष्ट्रमंत्री यांच्या मार्गदर्शना...