युद्ध योग्य का ?
युद्ध योग्य का ?
आधी झालेले युद्ध हे ब्रिटीश इंडिया आणि चीन मधील हद्दीवरून सुरु झाले. ब्रिटिशांनी सतराव्या शतकात हद्दनिश्चिती आणि त्याचे रेखाटन याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्या कारणाने लदाख (उत्तर विभाग), उत्तरांचल (मध्य विभाग) आणि अरुणाचल प्रदेश (ईशान्य विभाग) या राज्यांच्या सीमांवर तणाव उत्पन्न झाला होता. चीनने भारताच्या नकळत १९५२ ते १९५७ मध्ये दक्षिण तिबेट आणि झीग्नियांग या प्रदेशांना जोडणारा महामार्ग बांधून युद्धजन्य गोष्टींना प्रभावित केले. त्यापुढे ब्रिटीश शासनातील प्रमुख सर मॅकमोहन आणि चीन शासन यांच्या नियोजनाखाली सीमारेषा आखली गेली, परंतु १९५० मध्ये ही मॅकमोहन रेषा आपणास मंजूर नाही असे चीनचे धोरण राहिले. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय यांच्यात काही वाताघातीच्या बैठका झाल्या मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. एप्रिल १९६० च्या या बैठकीत चीनने अक्साई या भागाची मागणी केली म्हणजे मॅकमोहनरेषेचा स्वीकार होईल मात्र असे काहीही झालेच नाही.
म्हणून १९६१ मध्ये भारत - चीन असे युद्ध झाले होते. आणि विवाद अगदीच सीमेवरून होता. या युद्धातील जवानांकडे पुरेसे कपडे, दारुगोळा आणि रसदीचे मार्ग देखील नव्हते. या युद्धामध्ये हिमालयाच्या उंच असल्याने ४२५० मीटर वरून याप्रकारे दोन्ही देशांच्या फक्त आणि फक्त भूदालामार्फत युद्ध झाले. नौदल आणि हवाईदल यामध्ये सहभागी झाले नाही. हे युद्ध शीतयुद्ध या प्रकारचे झाले. हे शीतयुद्ध नेपाल, भूतान अशा अन्य देशांना तर अरुणाचल प्रदेश यासारख्या राज्यातही झाला. युद्धाचा प्रदेश समुद्र-सपाटीच्या वर जवळ जवळ ५००० मीटर वर असल्याने दोन्ही देशांतील बरेच सैनिक युद्धामुळे नाही तर बर्फाळ प्रदेशातील थंडीमुळे मरण पावले. हे सैनिक युद्धाचे नियोजन आपल्या देशाच्या आदेशानुसार करीत होते. हे युद्ध चीननेच जिंकले मात्र चीनचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व दर्जा खालावला गेला. त्यावेळी नेहरूंनी सर्व अपयश स्वीकारले होते, भारतामध्ये जितक्या सैनिकांना वीरमरण आले होते त्या सैनिकांची स्मारके उभारली गेली. आता नक्की मरण आणि वीरमरण हे किती प्रमाणात झाले हे देखील पहिले पाहिजे. २० ऑक्टोबर १९६२ ते २१ नोव्हेंबर १९६२ या जवळ- जवळ एक महिना चाललेल्या युद्धात किती मृत्यू आणि इतर गोष्टी घडल्या आहेत यासाठी पुढील एक तक्ता पहा;
घटक | भारत | चीन |
मृत्यू | १३८३ | ७२२ |
जखमी | १०४७ | १६९७ |
गहाळ व्यक्ती | १६९६ | - |
बंदी | ३९६८ | - |
वरील तक्त्यावरून हे साफ - साफ दिसते की भारताने आपले बरेच वीर - जवान या युद्धामध्ये गमावले. ठिकठिकाणी या सैनिकांची स्मारके देखील बांधण्यात आली. ज्यामध्ये काही भारतीयांनी आपला तरुण हाताशी आलेला मुलगा, नुकताच लग्न झालेला नवरा, नुकताच आपल्या मुला - मुलींची तोंड न बघू शकलेला बाप, लग्नाला परत येतो म्हणून ठरलेल्या लग्नात परत न आलेल्या प्रियकराचे आणि अशा बऱ्याच नात्यांना मुकलेले बरेच सैनिक मारले गेले. ही नाती नाती होती. त्यामध्ये मग ती भारतीय किंवा चीनी अशी विभागलेली नसतील.

आता या युद्धामध्ये किती यंत्रणा होती, तर भारताकडून १०,००० ते १२,००० इतके सैनिक बळ तर चीन कडे तब्बल ८०,००० इतकी फौज होती. तरीही भारताने बृज मोहन कौल, पंडित जवाहरलाल नेहरू, वी.के. कृष्ण मेनन, प्राण नाथ थापर या सेनाप्रमुखांच्या आदेशाने युद्ध केले. युद्धात मिळालेल्या अपयशानंतर नेहरूंनी 'हिंदी - चीनी भाई भाई' हा नारा लावला पण याकडे चीनने देखील संशयित नजरेनेच बघितले. यावेळी हे युद्ध थांबले मात्र भारताने दोन गोष्टी आपल्या देशात सुरु करण्यास सुरुवात केली.
१) आत्मनिर्भरता आणि
२) स्वदेशी (ज्या गोष्टी आपण पुन्हा करीत आहोत.)
भारत - चीन युद्ध एका वेगळ्या गोष्टींवर सुरु असताना आणि भारतीय सैन्य युद्धात कमजोर झाले आहे याची बातमी कानावर पडताच पाकिस्तानने देखील या युद्धात उडी मारली आणि जन्मू - काश्मीर मध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली. या युद्धात नक्की कोण जिंकले यावर अजून व्यवस्थित निर्णय नाही. मात्र त्यानंतर पुन्हा दोन वर्षाने भारत चीन मध्ये छोटेसे सीमा युद्ध झाले. यात भारताचे ४ तर चीनचे ८ बळी गेले. काही ठिकाणी हेच आकडे भारताचे ८० सैनिक तर चीनचे ४०० सैनिक मृत पावले असे म्हणतात.
बळींचा आकडा हा जर आत्ताच्या काळात बघितला तर सक्षम नोदल आणि हवाईदल यांच्या हल्ल्यात वाढलेला असाच दिसणार आहे. मात्र आपले सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मैत्री करण्यात खूपच पटाईत आहेत. (आपण त्यांना निवडून आल्यावर विविध विदेशी दौरे करताना बघितले.) आणि जर युद्ध करायचे झाले तरीही ते खूप पटाईत आहेत. (आपण त्यांना भारत - पाक उरी युद्धाच्यावेळी पण पहिले आहे.) चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांनी देखील युद्ध नको असे लक्षात घेतले पाहिजे.
त्यामुळे त्यांनी पहिला प्रयत्न शांतीचा स्वीकारावा कारण इतके नाहक बळी नको पुन्हा.... सुरवातीला प्रयत्न करायला हरकतच काय आहे. सध्यातरी कोरोनाला हरवायचे आहे प्रभावीपणे दोन्ही देशांना. पुन्हा एकदा १९६२ ची पुनरावृत्ती नको रे बाबा....
क्रमश:
प्रा. अलोक पवार
Comments
Post a Comment