बाबासाहेबांमुळे दिवाळी गोड

 बाबासाहेबांमुळे दिवाळी गोड

डॉ. अलोक पवार

यावेळी दिवाळीचे फटाके म्हणजे मोबाईल वरचे व्हाट्सअपचे मेसेज चे आवाज. व्हाट्सअप वर तर स्टेटस ला भरपूर शुभेच्छांचा वर्षाव होतो. वसुबारस च्या शुभेच्छा, ही लक्ष्मी पावो, ती भाग्य लक्ष्मी प्राप्त होवो असा खूप शुभेच्छा होत्या. 

एक मेसेज मात्र असा होता ज्यामध्ये दिवाळी आणि बाबासाहेबांमुळे दिवाळी असा होता. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो एका धर्माचा मोठेपणा सांगण्यासाठी आताच्या काळात दुसऱ्या धर्माला नाव अजिबात ठेवू नका. सध्या आपण असे केले तर फक्त आणि फक्त भांडण होतील. मी तो मेसेज नीट वाचला. कामगार, महिन्यांचा हिशोब आणि बोनस यावर होता. 



भारत स्वातंत्र होण्याच्या कारकिर्दीमध्ये बरेच लोक असे होते की ज्यांना घर चालवायचे होते. ते शेती नाही म्हणून शेतावर उपजीविका करू शकले नाहीत. आणि घरचे झाले थोडे म्हणून घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्रवीर देखील बनू शकले नाहीत. त्यांच्या नजरेसमोर प्रपंचाचा महामेरू होता. म्हातारे आई वडील होते. पोरांच्या पोटाची भूक होती. इंग्रजांच्या पदरी पडेल ती नोकरी मिळावी चार पैसे मिळावे हिच माफक अपेक्षा. बरेच जण होते असे. इंग्रजांनी देखील अमाप पैसा मोठा करण्यासाठी कंपन्या उभारल्या, कारखाने - गिरण्या तयार केल्या. त्यातील कामगार सर्व भारतीय. त्या सर्वांच्या आधारे साधा माणूस कामगार झाला. कंपनीत काम करू लागला. रोजंदारीच्या जीवावर भूक भागविणारी माणसे कंपनीत काम करू लागली. रोजंदारीचे काय कधी मिळते कधी नाही, त्यातूनही छोटे काम म्हणून पैसा छोटा. जशी कारखानदारी वाढली तसा पैसा मोठा झाला. शिवाय लोकांकडून जी वागणूक भेटायची ती काहीशी थांबली म्हणून बऱ्याच लोकांनी अशा चाकऱ्या स्वीकारल्या. 

पण तिकडची परिस्थिती चांगली होती का? स्वर्गसूख होते. मुळातच इंग्रज तोडो आणि फोडो च राजकारण करून भारतात आलेले. त्यांनी भारतीयांचे मूळ ओळखलेलं. त्यामुळे कामगारांना दरमहा पगार देऊबा त्यांचं कल्याण होतंय हे त्यांचे फक्त आणि फक्त दाखवायचे दात होते.

ज्यावेळी मालक - नोकर ही संकल्पना होती, म्हणजे अजूनही आहे. फक्त आणि फक्त आपण पगार देतोय म्हणून आपण मालक हा मूर्खपणा डोक्यात ठेवून आव आणणारी लोक अजून आहेत. पण त्यांना हे कळत नाही की काम करणारी कर्तब लोक आहेत म्हणून त्यांची उपजीविका चालते आहे. म्हणून त्यांचे देखील पोट भरते आहे. त्यामुळे ते नाही तर तो काम करणारा श्रमिक त्यांच्यावर उपकार करतो आहे. या संकल्पनेच्या सुरवातीला मजुरास आठवडी पगार दिला जायचा. तेंव्हा प्रत्येक आठवड्याला काम करणारा मजूर वेतन घेऊन घरी असायचा. इंग्रजांनी ही आठवडी पगाराची पद्धत बदलून इंग्रजी कॅलेंडर नुसार मासिक पगाराची पद्धत सुरु केली. आणि ही भोळ्या भाबड्या जनतेकडून स्वीकारली देखील गेली. वेतन भेटते आहे ना इतके पुरे होते. ज्यावेळी आठवडी पगाराची संकल्पना होती त्यावेळी ५२ आठवडे पगार मिळायचा. पण ज्यावेळी इंग्रजी कॅलेंडर नुसार पगार भेटायला प्राप्त झाला तेंव्हा पगार १२ महिन्यांचा पगार मिळू लागला. चार आठवड्यांचा मोजून महिना केला तर एकूण १३ महिने पगार भेटला पाहिजे तिथे हा भोळा भाबाड मजूर, कामगार आणि मालकांच्या भाषेतला नोकर अजूनही वर्षाचा पागर भेटतो म्हणून खुश होतोय. बाबासाहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली. आणि त्यांनी त्वरित सरकारला तेराव्या महिन्याचा पगार देखील् काम करणाऱ्या व्यक्तीस मिळाला पाहिजे अशा आशयाचे पत्र लिहिले. व पगार मिळाला नाही तर आंदोलने होतील निर्देशने होतील त्याला सामोरे जायची तयारी ठेवा हे देखील ठणकावून सांगितले. 

त्यावेळच्या सरकारने देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेल्या मुद्द्यावर विचार करून तेरावा पगार कसा देता येईल यावर विचार करण्यास सुरवात केली. त्यातही बाबासाहेबांनी सरकारला हिंदू धर्माचा मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या दिवाळीत खर्च देखील धर्मिकतेच्या आधारावर होतो. त्यामुळे दिवाळीच्या आधी एक पगार देण्यात यावा. व या आगाऊ दिलेल्या पगारास बोनस असे म्हणले गेले. आणि या नंतर म्हणजे ३० जुन १९४० साली बोनस कायद्याची सुरवात झाली. कामगारांना बोनस मिळू लागला. मिळू लागला. मिळू लागला. मिळू लागला.....???

माझे वडील एका कंपनीमध्ये कामगार होते. मोठी कंपनी होती. आता कंपनीचे नाव नाही लिहित. उगाच कंपनीची बदनामी नको. म्हणजे तसे म्हणायचे झाले तर किती कंपन्यांची, संस्थांची नावे शोधायची असे म्हणायला हरकत नाही. त्या कंपनीतून पप्पा दिवाळीच्या सुरवातीला मस्त मिठाईचा बॉक्स आणायचे. बाहेरून मस्त रंगीत पेपर मधला तो बॉक्स उघडायचा आणि आतमध काय आहे ते बघायचे हे सर्वांनी घरात एकत्र असताना करायचे. आणि बॉक्स चे झाकण उघडले की प्रत्येकाच्या तोंडाला अगदी पाणी सुटायचे. म्हणजे ताई म्हणायची हे माझे, मी म्हणायची नाही माझे, भांडण नकोत म्हणून प्रत्येक मिठाईच्या छोट्या तुकड्याचे आणखी तुकडे व्हायचे आणि उरलेला म्हैसूरपाक आणि माहीम हलवा मम्मी आणि पप्पाना गोड माणून खावा लागायचा. म्हणजे वर्षभर काम करणाऱ्या त्या पप्पाना दिवाळी आली की त्या माहीम हलव्यावर गोड मानून घ्यावेच लागायचे कारण आंबेडकरांनी केलेला कायदा कुठे लागू झाला कोणत्या कंपन्यांसाठी हा कायदा होता कोणत्या संस्थानी या कायद्याचे पालन केले. कोणत्या मालकांच्या मनात कामगार शोषण होऊ नये म्हणून तो कायदा लागू करून घ्यावासा वाटतो आहे. 

त्या दिवाळीला वडिलांनी आणलेला मिठाईचा बॉक्स बघून मी खूप खुश व्हायचो. तोंडाला पाणी सुटायचे. आजची परिस्थिती काही वेगळी आहे. दहा हजार पगार मिळणाऱ्या मजुराच्या हातात एक मिठाईचा बॉक्स पडला की तो खुश होतो. त्याला त्याच्या घरची लहान मुले दिसतात. पण त्याला आजच्या डांबिस मालकांची खेळी दिसत नाही, त्याच्याच तेराव्या महिन्याच्या पगारातला हजार पाचशे रुपयांचा मिठाईचा बॉक्स, किंवा एखादा कपडा त्याला दिवाळीचा बोनस म्हणून दिला गेलाय. आणि उरलेला सारा पैसा मालकाच्या बँकेत राहिलाय. मालक त्यावर बँकेचे व्याज पण घेतोय आणि गोड चेहरा करून मस्तपणे त्या नोकराला म्हणतोय 'ही दिवाळी तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो'

मालकांनी 'तुमच्या परिवाराला' हा शब्द कशाला बोलावा, मिठाईच्या डब्यात सर्वांसाठी पुरेल इतकी मिठाई नाहीच. सुख त्याने कसे दिले आहे त्याचा तर त्याने खेळ केलाय. कामगारांच्या तेराव्या महिन्याच्या पगार खाऊन समृद्धी ही कामगारवर्गाची होतच नाही मुळी. आणि भरभराट ही त्या कामगारांची कशी होणार त्याला अजून ओव्हर टाईम करायचा आहे. त्याला आकाशकंदील, पणत्या, बायकोसाठी साडी खरेदी करायची आहे आणि एवढं सगळं करताना कधी आजारपण आल तर तेही काढायचं आहे त्यामुळे भरभराट कसली ही दिवाळी दिवाळ काढणारी आहे म्हणायला काही हरकत नाही.

बाबासाहेब तुम्ही अजून थोडे दिवस अजून पाहिजे होता. तुमचे विचार कायद्यात आहेत. पण त्या कायद्याच्या पळवाटा काढणारे आणि इंग्रजी डोक्याचे मालक आज देखील इथे आहेत. त्यांना कायद्याचे फटके द्यायला तुम्ही आजही पाहिजे होते. दिवाळीची मालकाकडून मिळालेली मिठाई गोड नसून ती कशी फसवणूक आहे ते सांगायला तुम्ही आज पाहिजे होते. 

त्या दिवाळीला खर गोड करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा नावाचा दिवा आज दारात लावलाच पाहिजे

Comments

Popular posts from this blog

भगवतगीता : अध्याय १

युद्ध योग्य का ?

१ जाने १८१८ युद्ध नक्की कोण विरुद्ध कोण?